मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा 'छपाक' चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आहे. 'छपाक' चित्रपटात ती एका ऍसिड पीडीत मुलीच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. शिवाय 'छपाक'मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. या चित्रपटामुळे ती अधिक चर्चेत आली आहे. १० जानेवारी रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत चर्चेमध्ये असतातच तिने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. त्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. यासर्व प्रकारानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. आता तिने सोशल मीडियावर स्वत:चे नाव बदलले आहे. 



तिने नाव बदललून अभिनेता रणवीर सिंगचे नाव लावले नाही तर तिने तिच्या ट्विटरवर 'मालती' असे नाव लिहिले आहे. तर आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला असणार ही मालती नक्की आहे तरी कोण? तर 'छपाक' चित्रपटात तिने मालती नावाच्या एका ऍसिड पीडित मुलीच्या भूमिकेला न्याय दिले आहे. 


तर दीपिका  कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत वैयक्तिक आयुष्यातीलही बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. दीपिकाच्या आधी अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडीयावर तिचे नाव बदलून  'झोया' असे ठेवले होते. पण तिचा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला.