रणवीरच्या फोटोवर दीपिका फिदा, दिली अशी कमेंट
रणवीरच्या फोटोवर दीपिकाची अशी प्रतिक्रिया
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी कधीही याचा उघडपणे स्विकार केलेला नाही. आपल्या रिलेशनशिपबद्दल त्यांनी कधीही उघडपणे वक्तव्य केलं नाही. पण नुकताच दीपिकाने रणवीरबाबत काही असं म्हटलं आहे की, सगळ्यांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती झालं आहे. दीपिकाने सगळ्यान समोर हे कबुल केलं आहे की, रणवीर फक्त तिचा आहे.
रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोवर अनिल कपूर आणि मल्लिकाने देखील कमेंट केली आहे. फॅन्स देखील या फोटोला लाईक करत आहेत. यातच दीपिकाने रणवीरच्या या फोटोवर "mine" अशी कमेंट केली.
दीपिका रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या रिलेशनने इंस्पायर झालेली दिसत आहे. दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जसे डील करत आहेत. दीपिका देखील तिच्या रिलेशनशिपबद्दल आता उघडपणे बोलायला लागली आहे.