मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण (deepika Padukone) ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडची (Bollywood) हीच मस्तानी मध्यंतरी एका गंभीर आजाराचा सामना करत होती. या आजाराबाबत प्रथमच ती मीडियासमोर खुलेपणाने बोलली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका प्रसिद्ध चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत, दीपिका (deepika Padukone) म्हणाली की, 2015 या वर्षी मी एका गंभीर आजाराशी झूंज देत होती. या आजाराबाबत मला काडीमात्र कल्पना नव्हती. जर माझ्या आईने लक्षणे ओळखली नसती, तर मला या आजाराबाबत कळालंच नसत, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. 


दीपिका पदुकोण (deepika Padukone) ज्या आजाराबाबत बोलत होती. तो आजार मानसिक आजार (Mental Health) होता. 2015 साली ती या आजाराशी झूंज देत होती. या आजाराबाबत मुलाखतीत बोलताना दीपिका पुढे म्हणाली की, “माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि प्रत्येक वेळी ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमीच खंबीर राहायचे, जसे सर्व काही ठीक आहे. पण एकदा ते बंगळुरूला परत जात असताना मी पुर्णत खचलेले. यानंतर आईने मला काही प्रश्न विचारले, यावेळी मला एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी असे वाटले की देवाने त्यांना माझ्यासाठीच पाठवले आहे.
 
मुलाखतीत दीपिका (deepika Padukone) पुढे म्हणाली की, जर तिच्या आईने तिची लक्षणे ओळखली नसती तर आज ती कोणत्या अवस्थेत असते हे तिला माहित नसते. तसेच मी या आजाराशी झूंज देत असताना माझ्या आईची भूमिका खूप महत्त्वाची होती,असा धक्कादायक खुलासा देखील तिने केला.


दरम्यान दीपिका पदुकोण (deepika Padukone) 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (World Mental Health Day)  तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशन लाइव्ह-लव्ह-लाफच्या ग्रामीण समुदाय मानसिक आरोग्य (Mental Health) कार्यक्रमाचा विस्तार करत आहे.यादरम्यान अभिनेत्रीने मानसिक आरोग्याविषयी आणि त्याला कसे सामोरे जावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले.