दीपिका निघाली Cannes ला; नवरा आला सोडायला...
फ्रेंच रिव्हेरा इथं 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केलं आहे. या फेस्टिव्हलसाठी दीपिका मुंबईहून रवाना झाली.
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रात्री ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. फ्रेंच रिव्हेरा इथं 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केलं आहे. या फेस्टिव्हलसाठी दीपिका मुंबईहून रवाना झाली.
दीपिका या फेस्टिव्हलची ज्युरी असणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. यावरून दीपिका चांगलीच चर्चेत आहे. 16 ते 28 मे दरम्यान दीपिका यात व्यस्त असणार आहे. फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. तिच्यासोबत इराणी चित्रपट निर्माते असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस आणि अभिनेत्री पटकथा लेखक व निर्माती रेबेका हॉल यात सामील होतील. दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे
दीपिका पदुकोणबद्दल बोलायचे तर, तिने एअरपोर्ट लूकसाठी ऑल-बेज आउटफिट निवडला होता. यासह तिने काळ्या रंगाची पर्स कॅरी केली होती. यामध्ये ती एकदम स्टनिंग दिसत होती. रणवीर सिंगनी दीपिकाला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आल्याचं दिसलं. कारमधूनच रणवीरनं दीपिकाला निरोप दिला.