मुंबई : काही दिवसांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता इरफान खान आणि दीपिका पादुकोणच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने शूटिंग रद्द करण्यात आले होते.  


इरफानच्या प्रकृतीबाबत चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता इरफान खानला सुरूवातीला काविळीचा त्रास होत असल्याची चर्चा होती. मात्र आता इरफान एका दुर्मिळ आजाराशी लढा देत असल्याचे त्याने स्वतः एका ट्विटमध्ये लिहले आहे. 


इरफान खानच्या भेटीला दीपिका पादुकोण  


 इरफानसोबत दीपिका काम करत असताना त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. गेल्या दोन आठवड्यापासून इरफान खान आजारपणामुळे शुटिंगपासून दूर गेला आहे. दरम्यान नुकतीच दीपिकाने इरफानची भेट घेतली आहे. 


 प्रार्थना करण्याची विनंती  


  इरफान खान एका गंभीर आजाराशी लढत आहे. त्यामुळे त्याला आजारातून बाहेर पडण्यासाठी औषधोपचारांसोबत चाहत्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेची गरज असल्याचे दीपिकाने म्हटले आहे.  दीपिका आणि इरफान यापूर्वी 'पीकू' चित्रपटामध्येही एकत्र दिसले होते.  


दीपिकापूर्वी दिग्दर्शक सुजीत सरकारनेही इरफानची भेट घेतली होती. त्यावेळेस इरफानच्या प्रकृतीबाबत लवकरच नवी माहिती समोर येणार आहे, विनाकारण त्याच्या आजारपणाबाबत तर्क वितर्क लावू नका असे सुजीत सरकारनं म्हटलं आहे.