मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही कायम तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी चर्चेत असते. फक्त चाहतेच नव्हे, तर बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रीसुद्धा या दीपिकाच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसतात. पण, आता खुद्द दीपिका कोणाच्या स्टाईल स्टेटमेंटला फॉलो करतेय पाहिलं का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा सध्याचा एअरपोर्ट लूक पाहताना हाच प्रश्न विचारावासा वाटतोय. बऱ्याच फॅनपेज आणि बॉ़लिवूड इन्स्टा पेजेसवर  बी टाऊनच्या या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


या एअरपोर्ट व्हिडीओमध्ये दीपिका संपूर्ण लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. लाल रंगाची स्किनी पँट, हायनेक- थ्री फोर्थ स्लिव्ह असणारं लाल रंगाचं टी शर्ट अशा लूकमध्ये ती यावेळी दिसली. 


लूकला आणखी खास टच देण्यासाठी लाल रंगाची टोपी आणि फुटवेअरही तिनं यावेळी कॅरी केली होती. फॅशनिस्तांच्या नजरेतून सांगावं तर हा एक अफलातून लूक ठरला. 



पण, नेटकऱ्यांना मात्र यावेळी तिची जादू रुचली नाही. हिला पँट घालायची होती की प्लास्टिक, हे प्लास्टिक का घातलंय दीपिकानं अशा एक ना अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या. 


काहींनी तर तिच्या या फॅशन सेन्सला रणवीरचाच परिणाम असल्याचंही म्हटलं. आता हा नेमका प्रभाव कुणाचा हे फक्त दीपिका किंवा तिची स्टायलिस्टच सांगू शकतात नाही का?