मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थिती विरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO)ने 'सेफ हँड' नावाचं एक चॅलेंज सुरु केलं आहे. या चॅलेंजसाठी WHOने अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांची निवड केली आहे.


काय आहे सेफ हँड चॅलेंज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठलाही विषाणू हा अस्वच्छतेमुळे अधिक जोमाने पसरतो.  या अभिनयाची सुरुवात त्यांनी 'सेफ हँड चॅलेंज'ने केली आहे. या चॅलेंजअंतर्गत लोकांना हात कसे धुवायचे? हे शिकवले जाणार आहे. भारतात हे प्रशिक्षण देण्यासाठी WHO चे संचालक डॉ. टेड्रोस एधानोम यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांची निवड केली आहे. प्रियांका आणि दीपिका व्हिडिओद्वारे लोकांना हात कसे धुवायचे हे शिकवणार आहेत.




जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ११७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.