Good News! दीपिका-रणवीर झाले आई-बाबा, घरी आला नवा पाहुणा
Deepika Padukone: दीपिका रणवीर आई-बाबा झाले आहेत. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पापाराझीकडून ही पोस्ट टाकण्यात आली आहे.
Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह यांच्या यांच्या घरी गोंडस परीचे आगमन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. HN रिलायन्स रुग्णालयात दीपिकाने बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान अद्याप दीपिका-रणवीरकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
शनिवारी, दीपिका गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर आज तिने मुलीला जन्म दिला असल्याची बातमी समोर येत आहे. तसंच, शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शनदेखील घेतले होते. Viral bhayani या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. तसंच, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीच दीपवीरच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे, असं लिहिण्यात आलं आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज दिली होती. त्यानंतर दीपिकाच्या बेबी बंपवरुन तिला ट्रोलदेखील करण्यात आले होते. दीपिका गरोदर नसून तिने सरोगसीचा आधार घेतला असल्याचे आरोप करण्यात येत होते. दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होतं. यावर दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. बोल्ड फोटोशूट करत दीपिकाने आरोप व ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना चांगलीच चपराक लगावली होती.
दीपिका-रणवीर यांनी 2018 मध्ये इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. जवळचे मित्र-मैत्रिण व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर मुंबईत व बेंगळुरुत त्यांनी रिसेप्शन ठेवलं होतं. दीपिका-रणवीर आई-बाबा झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.