Deepika Padukone and Ranveer Singh With Daughter : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. तेव्हा पासून त्यांच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक आतुरत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं दीपिकानं तिच्या लेकीच्या पायांचा एक फोटो शेअर करत लेकीचं नाव दुआ असल्याचं सांगितलं. पण तिनं किंवा रणवीरनं त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. आता दीपिका आणि रणवीरसोबत दुआ पहिल्यांदा बाहेर स्पॉट झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका, रणवीर आणि दुआचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांची गाडी येत असल्याचे पाहते. त्यानंतर ते कलिना विमानतळावर जातात. यावेळी दीपिकानं त्यांच्या लेकीला अर्थात दुआला बेबी कॅरियरमध्ये घेऊन जाताना दिसली. यावेळी दीपिकानं दुआला पूर्णपणे कव्हर केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, दुआची एक झलक पाहून नेटकरी त्यावर कमेंट करताना दिसत आहेत आणि त्यांच्यावर सगळ्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 



हेही वाचा : उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली; नेटकऱ्यांनी तिलाच सुनावलं, 'तू आधी कपडे....'



दीपिका आणि रणवीर 2018 मध्ये लग्न बंधनात अडकले. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीत त्या दोघांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली. दिवाळीत लेकीचं नाव आणि त्याचा अर्थ सांगत त्या दोघांनी जी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की दुआ पादुकोण सिंग. दुआ याचा अर्थ प्रार्थना. ती आमच्या प्रार्थनांना मिळालेलं उत्तर आहे. आम्हाला खूप आनंद आणि कृतज्ञता आहे. ही पोस्ट त्यांनी लेकीच्या पायाचा फोटो शेअर करत सांगितलं आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते दोघे नुकतेच 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसले. या चित्रपटात दोघं पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले.