`या` 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम
Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...
Deepika Padukone Unlucky For This Actor : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज 5 जानेवारी 1986 रोजी 37 वा वाढदिवस आहे. (Deepika Padukone Birthday) दीपिकाचा जन्म कोपनहेगन, डेन्मार्क येथे झाला होता. दीपिका एक वर्षाची असताना तिचं कुटुंब हे बेंगळुरुला शिफ्ट झालं होतं. दीपिकानं मॉडेलिंग करत ग्लॅमरच्या जगात एण्ट्री केली. तर 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) या चित्रपटातून दीपिकानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खाननं (Farah Khan) केलं होतं. तर चित्रपटात शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुख्य भूमिका होती.
दीपिका आणि शाहरुखनं एकत्र अनेक चित्रपट केले आणि ते सगळे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता 4 वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा चित्रपट करत असून तो दीपिकासोबत 'पठाण' (Pathaan) दिसणार आहे. तर यामुळे दीपिका ही शाहरुखसाठी लकी आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र, याविषयी बोलायचे ठरवले तर ती जवळपास 10 कलाकारांसाठी लकी ठरली नाही. त्यापैकी 5 असे कलाकार आहेत जे पुन्हा दीपिकासोबत कोणत्याही चित्रपटात दिसले नाही.
दीपिकासोबत फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' (Karthik Calling Karthik) हा चित्रपट केला होता. हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि चित्रपटानं जवळपास फक्त 26.92 कोटी रुपयांची कमाई केली. फरहाननं हा चित्रपट जेव्हा केला तेव्हा तो चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होता. त्यानंतर तो दीपिकासोबत कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
नील नितीन मुकेशचे (Neil Nitin Mukesh) बॉलिवूडमधील करिअर काही खास नाही. 2010 मध्ये त्याने दीपिका पदुकोणसोबत 'लफंगे परिंदे' (Lafangey Parindey) हा एकमेव चित्रपट केला. यानंतर केवळ 21.77 कोटी रुपये कमावले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई सरासरी होती. त्यानंतर तो दीपिकासोबत कधीही चित्रपटात दिसला नाही.
हेही वाचा : Anushka Sharma चा भाऊ कर्णेश करतोय 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट?
आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने (Imran Khan) 2010 मध्ये दीपिका पदुकोणसोबत 'ब्रेक के बाद' (Break Ke Baad) हा चित्रपट केला होता. या चित्रपटानं जवळपास 17.64 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली. दरम्यान, त्यानंतर इम्रान पुन्हा दीपिकासोबत चित्रपटात दिसला नाही.
दीपिका पदुकोणचा अभिषेक बच्चनसोबतचा (Abhishek Bachchan) पहिला चित्रपट 'खेलें हम जी जान से' (Khelein Hum Jee Jaan Sey) हा 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं तर बॉक्स ऑफिसवर फक्त 5 कोटी रुपयांची कमाई केली.
दीपिका पदुकोणनं अर्जुन कपूरसोबतचा (Arjun Kapoor) 2014 साली प्रदर्शित झालेला 'फाइंडिंग फॅनी' (Finding Fanny) हा चित्रपट होता. जवळपास 35.91 कोटींची कमाई करून हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर अर्जुन कपूर दीपिकासोबत कोणत्याही चित्रपटात दिसला नाही