Anushka Sharma चा भाऊ कर्णेश करतोय 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट?

Anushka Shrama चा भाऊ हा गेल्या अनेक वर्षांपासून या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jan 4, 2023, 05:46 PM IST
Anushka Sharma चा भाऊ कर्णेश करतोय 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट?

Anushka Sharma's Brother Karnesh Sharma Dating A Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या कुटुंबासोबत नेहमीच फोटो शेअर करताना दिसते. अनुष्का ही तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या अनुष्का तिचा भाऊ कर्णेश शर्मामुळे (Karnesh Sharma) चर्चेत आहे. कर्णेश हा सध्या बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत (Trupti Dimri)  रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तृप्तीसोबतचा फोटो कर्णेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच काय तर नवीन वर्षाच्या निमित्तानं तृप्तीनं कर्णेश शर्मासोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले आहे. इतकंच काय तर या दोघांनी फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबूली दिल्याचे म्हटले आहे. 

नवीन वर्षाचे स्वागत करत तृप्तीनं कर्णेशसोबतचा एक रोमॅंटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला होता. यावेळी हा फोटो शेअर करत 'माझे प्रेम'. या फोटोत तृप्तीनं कर्णेशला मिठी मारल्याचे दिसत आहे. तर कर्णेश तिच्या गालावर किस करत आहे. जेव्हा नेटकऱ्यांनी तिची ही पोस्ट पाहिली तेव्हा नेटकऱ्यांनी ते दोघे नक्कीच रिलेशनशिपमध्ये असणार असे म्हटले. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर दुजोरा दिलेला नाही. 

Anushka Sharma s Brother Karnesh Sharma Dating this Bollywood Actress

तृप्ती ही नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. तृप्तीनं 2017 साली प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉईज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर तृप्ती बुलबुल, काला आणि लैला मजनू या चित्रपटांमध्ये दिसली. हे चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. त्यात बुलबुल आणि काला हे दोन्ही चित्रपट अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशच्या प्रोडक्शन बॅनर क्लीन स्लेट फिल्म्स मध्ये बनवण्यात आले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : तुनिषा आत्महत्या प्रकरणावर Manasi Naik ची पोस्ट म्हणाली, "माझ्यावर वाईटवेळ..."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, कर्णेश हा अनुष्का शर्माचा मोठा भाऊ आणि लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहे. क्लीन स्लेट फिल्म्स हे प्रोडक्शन अनुष्का आणि कर्णेश दोघांचे आहेत. मात्र, काही वर्षांनंतरच अनुष्कानं या प्रोडक्शन हाऊसची संपूर्ण जबाबदारी तिच्या भावावर सोपावली. बहीण अनुष्का शर्मा काम करत असलेल्या NH 10 या चित्रपटातून कर्णेशनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय कर्णेशनं 'बुलबुल', 'काला', 'फिल्लौरी', 'परी' आणि 'पाताल लोक' या लोकप्रिय वेब सिरीज बनवल्या. इतकंच काय तर अनुष्काचा आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस' ची निर्मिती कर्णेशनं केलेली आहे.