मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण सतत चर्चेत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलचं गाजत आहे. या जाळ्यामध्ये दीपिकाचं देखील नाव आहे. ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असलेली दीपिका आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आलेल्या 'पठान' चित्रपटाची चर्चा सध्या रंगत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरूख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाची कथा ऍक्शन-थ्रिलरवर आधारित असणार आहे. तर चित्रपटाच्या शुटिंगसाठी बजेट देखील मोठं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे चित्रपटासाठी दीपिकाने किती मानधन घेतलं आहे, याची देखील चर्चा रंगली आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाने चित्रपटासाठी तब्बल १४ ते १५ कोटी रूपयांचं मानधन स्विकारल्याची चर्चा आहे. दीपिका चित्रपटाची शुटिंग पुढच्या वर्षी सुरू करणार आहे. दीपिकाच्या आधी जॉन चित्रपटासाठी किती मानधन स्विकारणार याची चर्चा होती. 


तर 'पठान' चित्रपटासाठी जॉनने २० कोटी रूपयांचे मानधन घेतले आहे. ज्यासाठी त्याला ६० दिवसांमध्ये शुटिंग पूर्ण करायचं आहे. २०० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये चित्रपटाचं काम पूर्ण होणार आहे. २०२१ रोजी 'पठान' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.