मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या मीडियातून समोर येत होत्या... याच दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा या जोडिला एकत्र पाहिलं गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि दीपिका डिनर डेटवर जाताना दिसले. उल्लेखनीय म्हणजे यावेळी क्रिकेटर आणि दीपिकाचा एकेकाळचा बॉयफ्रेंड युवराज सिंहही यावेळी त्यांच्यासोबत होता.


साऊथ मुंबईच्या एका पॉश लाईट क्लबच्या बाहेर दीपिका - रणवीर दिसले. यावेळी, दीपिका नाइट सूटमध्येच होती... आणि मेकअपच्या नावावर तिनं केवळ डार्क रंगाची लिपस्टिक वापरली होती. केस घट्टपणे मागे बांधलेले होते... दुसरीकडे रणवीर मात्र अप-टू-डेट दिसत होता.


रणवीर आणि दीपिका हे दोघे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिद कपूरही एका मुख्य भूमिकेत आहे.