Deepika Padukone : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज हिला कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. हल्ली पठाण चित्रपटातील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झाल्यानंतर सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या गाण्यातील तिचा बोल्ड लूक अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाने स्वत:ची ओळख जागतिक स्तरावर केली आहे. आलेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोण अमेरिकन कंपनी 'पॉटरी बार्न'ची (pottery barn) ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मोठी डिजिटल-फर्स्ट, होम रिटेलर कंपनी आहे. या कपंनीने दीपिका पदुकोणला ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) बनवले आहे. 



इन-हाऊस डिझाइनमध्ये दीपिका काम करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पॉटरी बार्न' ही कपंनी एक पोर्टफोलिओ ब्रँड आहे. ज्यामध्ये रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडने पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपनंतर, सप्टेंबरमध्ये रिलायन्सने दिल्लीत पहिले स्टोअर उघडले. दीपिकाचे चाहते या बातमीमुळे खूप खूश असल्याचे दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं स्थित असलेल्या या कंपनीच्या इन-हाऊस डिझाइनमध्ये दीपिका काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नवीन प्रकल्पामुळे दीपिका आनंदी असल्याचे दिसत आहे. 



अप्रतिम काम करण्यास उत्सुक


“इंटिरिअर डिझायनिंगची माझी आवड कोणापासून लपलेली नाही. त्यामुळेच मी जागतिक होम फर्निशिंग लीडर पॉटरी बार्न यांच्यासोबत एकत्रित होऊन काहीतरी अप्रतिम करण्यास उत्सुक आहे.” 'पॉटरी बार्न'ची ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यानंतर दीपिकाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली आहे.



दीपिका पदुकोणसोबत पार्टनरशिप


“आम्ही ग्लोबल आयकॉन दीपिका पदुकोणसोबत पार्टनरशिप करण्यास उत्सुक आहोत. 2023 मध्ये, आम्ही नवीन कलेक्शन लॉन्च करू आणि ग्राहक  दीपिकाच्या सिग्नेचर स्टाइलसह त्यांची घरे सजवू शकतील.” असं पॉटरी बार्नच्या मुख्य डिझाइन अधिकारी मोनिका भार्गव म्हणाल्या.



दर्जेदार सेवा आणि गुणवत्तेसाठी जगभरात ओळख


पॉटरी बार्न हे होम फर्निशिंग मध्ये दर्जेदार सेवा आणि गुणवत्तेसाठी जगभरात ओळखले जाते. ते असे प्रोडक्ट्स तयार करतात जे जास्त काळ टिकतात आणि निसर्गाला हानी पोहचवत नाहीत. पॉटरी बार्न ही कंपनी फर्निचर, बेडिंग, आंघोळीच्या वस्तू, रग्ज, ड्रेप्स, टेबलटॉप्स, लाइटिंग आणि सजावटीच्या वस्तू इ. या सर्व गोष्टी तिथे तयार केल्या जातात.