मुंबई : सध्या दीपिका पदुकोण तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणची प्रकृती सेटवर अचानक बिघडल्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचा हार्ट रेट अचानक वाढल्याने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला तातडीने शहरातील कमिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीपिका पदुकोणला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.  


दीपिका शूटिंगला परतली का?
दुसरीकडे, साऊथच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवणाऱ्या मनोबाला विजयबालन यांनी तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे की, दीपिका आता पूर्णपणे बरी असून प्रोजेक्टच्या शूटिंगला परतली आहे. आतापर्यंत दीपिका किंवा दीपिकाच्या पीआर टीमने असं काहीही सांगितलेलं नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका सध्या आराम करत आहे.



दीपिका आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट केमध्ये ती प्रभाससोबत, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर तिने याआधी शाहरुख खानसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा एकत्र चौथा चित्रपट असेल. दीपिका आणि शाहरुख खान या दोघांनीही या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.