धक्कादायक : दीपिका पादुकोण देतीये `या` गंभीर आजाराशी झुंज
अभिनेत्रीने अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई : बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणजेच दीपिका पदुकोण हिला नुकतच अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्रीने अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दीपिकाला आता बरं वाटत आहे. पण दीपिकाची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर तिला अचानक रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
पण दीपिकाच्या बाबतीत असं वारंवार का घडतंय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतोय. अखेर सर्वांच्या लाडक्या दीपिकाला कोणता आजार आहे? दीपिका पदुकोणला कोणत्या आजाराने ग्रासलं आहे हे आज आम्ही आमच्या या रिपोर्टमधून तुम्हाला सांगणार आहोत.
दीपिका या आजाराने त्रस्त आहे
दीपिकाची प्रकृती खालावल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात विविध उपचार करण्यात आले. पण रिपोर्टनुसार, आता तिची तब्येत सुधारत आहे आणि चाहत्यांनीही अभिनेत्री बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अचानक हृदयाचे ठोके वाढणं अशा समस्यांमुळे दीपिकाला यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी दीपिका हैद्राबादमध्ये प्रभाससोबत तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
त्यादरम्यान तिला अर्धा दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर दीपिकाला हार्ट अरिथमीया नावाचा आजार आहे. ज्यामुळे यापूर्वी अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.
हार्ट अरिथमीया म्हणजे काय आणि हा रोग किती धोकादायक आहे?
दीपिकाला झालेल्या या आजाराला हार्ट अरिथमीया म्हणतात. हा एक हृदयविकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती आणि लय बिघडते. हृदयाच्या या गती आणि लय मागे हृदयाची विद्युत प्रक्रिया असते, जी विद्युत आवेग चालवते. आम्ही तुम्हाला सांगतो की हृदयाचे विद्युत आवेग विहित मार्गातून जातात.
हे सिग्नल हृदयाच्या स्नायूंच्या क्रियाकलापांमध्ये समन्वय साधतात, ज्यामुळे हृदय आरामात रक्त आत आणि बाहेर पंप करू शकतं. या मार्गातील समस्या किंवा विद्युत आवेगांमुळे अतालताची समस्या उद्भवते. हृदयाच्या अतालतामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये नुकसान होत नाही. पण जेव्हा ही समस्या मेंदू, फुफ्फुस, हृदय किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तप्रवाहात समस्या निर्माण करते, तेव्हा ती जीवघेणीही ठरू शकते.