मुंबई : सिनेमा जगातला  'बाहुबली' प्रभासने आगामी 'प्रोजेक्ट-के'साठी दिग्दर्शक नाग अश्विनसोबत आणि भिनेत्री दीपिका पदुकोणसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, मेगास्टार अमिताभ बच्चन हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'प्रोजेक्ट के' असं ठेवण्यात आलं असून, या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचं पहिलं शेड्यूल निर्मात्यांनी हैदराबादमध्ये सुरू केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. ईथे टीम प्रभास आणि दीपिकाचे काही सीन शूट करणार आहे. दीपिका पदुकोण काही दिवसांपूर्वी शूटिंग सुरू करण्यासाठी हैदराबादला गेली होती. तर प्रभास नुकताच सेटवर जॉईन झाला आहे. 



दरम्यान, निर्मात्यांनी प्रभास आणि दीपिका यांच्यावर शूट केलेल्या पहिल्या शॉटचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रभास आणि दीपिकावर बनवण्यात आल्याचं दिसत आहेत. ही एक ड्रीम कास्ट आहे, ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठी नावे अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.