मुंबई : सिंघम अनेगला लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. रोहित शेट्टी यावेळी कॉप युनिवर्समध्ये अशी धमाल करताना दिसत आगे. ज्यामुळे पुर्ण बॉक्स ऑफिस हलू शकतं. अजय देवगणच्या सुपरहिट फ्रेंचाईजीमध्ये दीपिका पदुकोणची लेडी सिंघमम्हणून एन्ट्री होणार आहे. आणि ती या सिनेमात शक्ति शेट्टी ही भूमिका निभावतेय. रोहित शेट्टीने आधी ही सिनेमाचे अनेक पोस्टर रिलीज केले होते. मात्र असं वाटतंय की, दीपिका पदुकोणला ते एक्स फॅक्टर बनवू ईच्छितात. तेव्हाच तर त्यांनी दीपिका पदुकोणची एन्ट्री कॉप यूनिवर्समध्ये कारवाई आणि तिला लेडी सिंघम बनवलं. इतकंच नाही तर तिने तर दीपिका पदुकोणला आपला हीरो बनवून टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टीने सिंघम अगेनचा नवा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, दीपिका पदुकोण सिंघम अजय देवगनप्रमाणे पंजेवाला पोझ करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत रोहित शेट्टीने लिहीलं आहे की, मेरी हिरो... रीलमध्ये देखील आणि रिअलमध्ये देखील. लेडी सिंघम दीपिका पदुकोण अशा प्रकारे तिने ईशारा दिला आहे की, सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोण धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि यामध्ये तिची भूमिका कमाल करणार आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका पदुकोण म्हणजेच लेडी सिंघमच्या या पोस्टरमध्ये पोलिसांच्या वर्दीत पाहिलं जाऊ शकतं. तिच्या डोळ्यावर चश्मा आहे आणि ती सिंघम पोज देताना दिसत आहे. दीपिका पदुकोणचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षावही होताना दिसत आहे. एका चाहत्याने लिहीलं आहे की, हे पाहणं आवश्यक आहे पोलिस युनिफॉर्ममध्ये दीपिका पदुकोण ताकदवान दिसत आहे. तर अजून एका चाहत्याने लिहीलं आहे की, शक्ती शेट्टीसाठी अजून वाट नाही पाहू शकत. सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, रणवीर सिंह, टाइगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे कलाकारही दिसणार आहेत.