लग्नानंतर दीपिका पदुकोणसाठी खूशखबर
हे वर्ष दीपिकसाठी खास
मुंबई : लग्नानंतर दीपिका पदुकोण वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. लग्नानंतर दीपिका रणवीर सिंहसोबत अनेक लग्नांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित होती. या सगळ्या व्यस्त शेड्युलमधून मोकळी झाल्यावर दीपिका पदुकोण लवकरात लवकर आपल्या सिनेमाचं शुटिंग पूर्ण करणार आहे. त्या अगोदर तिच्याकडून एक खुशखबर आली आहे.
इंस्टाग्रामवर दीपिका पदुकोणच्या फॉलोवर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. जवळपास 3 करोडहून अधिक फॉलोवर्स झाले असून या सगळ्या चाहत्यांचे दीपिकाने आभार मानले आहेत.
पोस्ट लिहून चाहत्यांना तिने ही महत्वाची बातमी दिली असून त्यांचे आभार देखील मानले आहेत. दीपिकाने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ मूनवॉक डान्स करताना दिसत आहे.
तिने लिहिलं आहे की, 3 करोड झाल्यानंतर मूनवॉक डान्स, याकरता आभार. एकूण पाहता दीपिकासाठी हे वर्ष अगदी खास राहिलं आहे.
2018 वर्षाच्या सुरूवातीला तिच्या पद्मावत सिनेमाने 300 करोडहून अधिक कमाई केली आहे. त्यानंतर 14-15 नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत इटलीत लेक कोमोमध्ये लग्न केलं आहे.
दीपिकाने अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. पहिल्यांदा कोंकणी पद्धतीने आणि नंतर सिंधी पद्धतीने हा सोहळा केला आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर दीपिका पदुकोण लवकरच दिग्दर्शक मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमाचं शुटिंग सुरू करणार आहे. या सिनेमात ती ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे.
दीपिकाने एका ट्विटमधून छपाकची माहिती दिली असून ती या प्रोजेक्ट करता भरपूर उत्सुक आहे. लक्ष्मी अग्रवाल हीची कहाणी अनेकांना माहित आहे.
या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मैसी असणार आहे. या अगोदर या रोलकरता अभिनेता राजकुमार रावची चर्चा होती. या सिनेमाचं शुटिंग पुढच्यावर्षी दिल्लीत सुरू होणार आहे.