मुंबई : दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप सोडली आहे. यात काही शंका नाही. तिने कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं आहे.  नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाला यांनी जगभरातील प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली.  जी सोशल मीडिया पासून गुगलच्या संशोधन आणि माध्यमांच्या उल्लेखांनुसार विविध क्रमवारीच्या घटकांवर आधारित आहे, ज्यामध्ये दीपिका शीर्षस्थानी आहे. मुख्य म्हणजे हा मान पटकवणारी दिपीका भारताततील पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. दीपिकाचे सोशल मीडियावर ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीतही दिपीका सोशल मीडियावर अव्वल आहे. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि गुगल सारख्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिपीकाला सर्वाधिक सर्च केलं जातं. 


दीपिका आंतरराष्ट्रीय प्रोडक्टची ब्रँन्ड अॅम्बेसेडर आहे. लेव्हीज, नाईकी, टिसॉट सारख्या ब्रँडची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तिने अलीकडेच तिचा दुसरा हॉलिवूड चित्रपट, एसटीएक्स फिल्म्स आणि टेम्पल हिलसाठी एक रोमँटिक कॉमेडीसाठी करार केला आहे. ती केवळ या चित्रपटातच काम करणार नाही, तर ती सहनिर्मिती देखील करणार आहे. दरम्यान, दीपिका रणवीरसोबत '83' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका 'पठाण' आणि 'फाइटर', 'द इंटर्न' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंह 'सर्कस', 'तख्त', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.