मुंबई : रक्षाबंधन हा सण भावंडांसाठी सगळ्यात खास असतो. आता रक्षाबंधन हा सण येतोय. तेव्हा साहजिकच बहीण आणि भावानी त्याची तयारी सुरू केली असावी. बॉलिवूडमध्येही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सेलेब्सही त्यांच्या भावंडांसोबत हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणला सख्खा भाऊ नाही पण एक अशी व्यक्ती आहे ज्याला ती भावाचा दर्जा देते आणि दरवर्षी त्याला राखी बांधायला विसरत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका बॉडीगार्ड जलालला राखी बांधते
दीपिका पदुकोण इंडस्ट्रीतील अव्वल अभिनेत्री आहे. तिला कोणताही सख्खा भाऊ नाही. पण तिला एक मानलेला भाऊ नक्कीच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तिला अजिबात वाईट वाटत नाही. कारण तिला जरी सख्खा भाऊ नसला तरी अशी एक व्यक्ती आहे. ज्याला ती कुटुंबापेक्षा जास्त मानते. आणि ती त्याला दरवर्षी रक्षाबंधनाला राखी बांधते. तो आहे तिचा बॉडीगार्ड जलाल. ती तिचं प्रत्येक रक्षाबंधन जलालसोबत घालवते. जलाल तिचं रक्षण करतो म्हणूनच दीपिकाने दरवर्षी त्याला राखी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


जलाल दीपिकाच्या सावलीचंही रक्षण करतो
जलाल हा दीपिकाचा बॉडीगार्ड आहे जो वर्षानुवर्षे तिच्या स्टाफचा भाग आहे. जेव्हाही दीपिका सार्वजनिक ठिकाणी जाते. जलाल प्रत्येक क्षणी तिच्यासोबत राहून तिचं रक्षण करतो. यासाठी जलाल दरमहा दीपिकाकडून भरमसाठ रक्कमही घेतो. दीपिका जलालला वर्षाला 80 लाख ते 1.2 कोटी पगार देते. जरी हा तिच्या व्यावसायिक एक भाग आहे. या व्यतिरिक्त, दीपिका जलालला कुटुंबाचा एक भाग मानते आणि म्हणूनच काहीही झालं तरी राखी बांधायला विसरत नाही.