Deepika Padukone on Depression:  दीपिका पदुकोण (deepika padukone) आज एक आघाडीची अभिनेत्री आहे, बोललीवूडमध्ये आज तिच्याच नावाचा डंका आहे. आपल्या अभिनयकौशल्याने आणि सौंदर्याने ती आज करिअरच्या शिखरावर आहे आज दीपिकाचा 37 वा वाढदिवस आहे (deepika padukon birthday) . सोशल मीडियावर चाहते दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कलाकारांचं आयुष्य आपल्याला पाहताना फार सुंदर वाटत पण त्यांच्या आयुष्यात कधीना कधी त्यांनीसुद्धा अनेक चढ-उतार पाहिलेले असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अभिनेत्री दीपिका पदुकोण हे सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलणारी ती अभिनेत्री आहे. ती ही एकेकाळी डिप्रेशनचा भाग असल्याचं बोलली आहे. त्याचबरोबर आता दीपिका पदुकोणने तिच्या नैराश्यावर मौन सोडलं असून एक धक्कादायक खुलासा केला आहे. जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (HappyBirthdayDeepikaPadukone)


दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, 'ती डिप्रेशनमध्ये आहे (deepika padukone in depression). हे तिच्या आईने ओळखलं.  डिप्रेशचा अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणाली, 'मी माझ्या आईला पूर्ण श्रेय देईन की, तिने हा आजार ओळखला, कारण मी चांगलं काम करत होते, माझ्या करिअरच्याही उंचीवर होते. पण अचानक माझं वागणं बदललं होतं. त्या दिवसात मला फक्त  झोप हवी होती. कारण झोप ही अशी एकमेव गोष्ट होती. ज्यामुळे मला थोडं बरं वाटायचं. माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे आणि मला त्यांच्याशी लढायचं होतं. (deepika padukon suicide attempt)  


आणखी वाचा: Happy Birthday Deepika Padukone : 4 अभिनेते, 2 क्रिकेटर ...; दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची यादी भलीमोठी


यासोबत ती म्हणाली, 'माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि जेव्हा ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमी स्वत:ला खंबीर दाखवायचे कारण तुम्हाला त्यांना दाखवायचें आहे की तुम्ही चांगले आहात, सर्व काही ठीक आहे. एके दिवशी माझे आई-वडील बंगलोरला परत जात असताना अचानक मी रडायला लागले, त्यानंतर माझ्या आईने मला विचारलं, बॉयफ्रेंडमध्ये आणि तुझ्यात काही झालं आहे का? कामात काही घडलं आहे का? कोणी काही बोललं आहे का? (deepika talked about her dipression)


माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती कारण असं काहीही झालं नव्हतं, माझ्या आत फक्त एक शून्यता होती. हीच ती वेळ होती जेव्हा माझ्या आईला समजलं की, मी डिप्रेशनमध्ये आहे. म्हणून हे ओळखण्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते. आता ती या परिस्थितीतून बाहेर आली आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'पठाण' चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार (deepika padukon pathaan movie ) आहे. यासोबतच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'प्रोजेक्ट-के'मध्येही दिसणार आहे (deepika with prabhas)