मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी 14 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. ज्यानंतर आता लग्नाला तीन वर्षे पूर्ण झालेली असताना ही जोडी एका खास ठिकाणी पोहोचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणवीर आणि दीपिकानं खास दिवस खास अंदाजात साजरा करण्याचं ठरवलं. शहरी धकाधकीच्या आयुष्यापासून ही जोडी काहीशी दूर गेली. 


दूर पर्वतांच्या कुशीत दीप-वीरनं प्रेमाची ग्वाही दिली आणि काही सुरेख फोटो शेअर केले.


काही फोटोंमध्ये दीप- वीरचा (Deepika Ranveer) बोल्ड आणि Cozzy अंदाजही पाहायला मिळाला. 


दोघांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत आपण नेमकं हा दिवस कसा साजरा केला हे सर्वांच्याच भेटीला आणलं. 


निसर्गाच्या सानिध्ध्यात, पर्वतांच्या कुशीत, गुलाबी थंडीत ही बी- टाऊनची जोडी काही दिवसांसाठी स्थिरावली होती. 





कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत एकमेकांसोबत व्यतीत केलेले हे क्षण त्यांच्यासाठी खास असतील यात शंकाच नाही. 


रुपेरी पडद्यासोबतच खऱ्या आयुष्यातही कपल गोल्स देणारी ही जोडी येत्या काळात '`83' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, दीपिका त्यांची पत्नी, रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.