मुंबई : बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत काम करावं अशी अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. त्यामध्येही सलमान खानसारख्या दबंग स्टार सोबत काम करण्यासाठी अनेकजणी सतत प्रयत्नशील असतात. पण अभिनेत्री दीपिका पादुकोणने मात्र चक्क सहा वेळेस सलमान खान सोबत काम नाकरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पादुकोणला हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करण्यासाठी सलमान कडून ऑफर मिळाल्याची माहितीही दीपिकाने काही मुलाखतींमध्ये बोलून दाखवली आहे. मात्र त्यावेळेस  कॅमेर्‍यासमोर येण्याची पुरेशी तयारी नसल्याचे दीपिकाने सांगितले आहे.'ओम शांति ओम' चित्रपटातून दीपिकाने पदार्पण केले  मात्र आपल्याला सगळ्यात पहिली संधी सलमान खानने देऊ केली होती, ही गोष्ट कायम मनात असल्याचे स्पष्ट करत त्याच्याबरोबर काम करायची इच्छाही तिने वेळोवेळी बोलून दाखवली होती.


 ‘सुलतान’,‘प्रेम रतन धन पायो’,‘किक’या चित्रपटांसाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे या चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करता आले नाही. मात्र 'किक २' या चित्रपटासाठी दीपिका आणि सलमान एकत्र दिसाणार आहेत. ही जोडी पहिल्यांदा रसिकांसमोर येणार आहे. 


 'किक' या चित्रपटाचा 'किक २' हा सीक्वेल आहे. किक मध्ये सलमान खानसोबत जॅकलीक फर्नांडिस झळकली होती.