मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनने आज मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज या संघटनेच्या  अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच  दीपिकाने अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचं कारण देखील सांगितलं आहे. सध्याच्या कामात व्यस्त आणि फिल्म महोत्सवच्या कामात दुर्लक्ष होत असल्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्यांचं दीपिकाने सांगितलं आहे. दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सांगायचं झालं तर, अभिनेता आमिर खानची पत्नी आणि फिल्ममेकर किरण रावच्या जागी दीपिकाची निवड झाली होती. 2019 साली दीपिकाची MAMIच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 2 वर्षांनंतर दीपिकाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.  हा निर्णय जाहीर करताना ती म्हणली 'माझ्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी MAMI च्या कामाकडे आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकेन.'


पुढे दीपिका म्हणाली, 'संघटनेच्या संचालक मंडळात असणं आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं हा अनुभव मला खुप काही शिकवून गेला.' असं देखील दीपिका म्हणाली. आता दीपिकाच्या जागी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती '83' चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेता ऋतिक रोशनसोबत 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.