मुंबई : दीपिका पदुकोण आपल्या सिनेमानंतर आंदोलनात सहभागी झाल्यामुळे चर्चेत आली आहे. जेएनयू हिंसाचाराविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. नवी दिल्लीतील आंदोलनात जेएनयूच्या विद्यार्थ्यांना दीपिका जाऊन भेटली. सिनेमा आणि सामाजिक भान यांचा ताळमेळ राखताना दीपिका दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झाल्यावर आडनाव न बदलता मुळ आडनावासोबत सासरचं आडनाव लावण्याचा अनेक मुली प्रयत्न करतात. असंच काहीस चित्र बॉलिवूडमध्ये देखील पाहायला मिळतो. पण दीपिकाने आपल्या आडनावातून 'सिंह' हा शब्द वगळला आहे. 


'छपाक' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दीपिका व्यस्त आहे. अभिनयासोबतच दीपिका या सिनेमात निर्मात्याची भूमिका देखील सांभाळत आहे. याबाबत दीपिका प्रश्न विचारण्यात आला की, 'दीपिका पदुकोण सिंह म्हणून तुझी ही पहिली सिनेमा निर्मीती आहे' तर तुला कसं वाटतंय? यावर दीपिकाने अगदी मजेशीर उत्तर दिलं की,'दीपिका पदुकोण असं बोला?' यावरून दीपिकाने कामात फक्त दीपिका पदुकोण असाच आपला उल्लेख केला आहे. 


एवढंच नाही तर पुढे दीपिका म्हणते की,'मला नाही तर रणवीर सिंहला आपलं नाव बदलून रणवीर सिंह पदुकोण करायला हवं' असं म्हटलं आहे. दीपिकाच्या नावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला कारण एका पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने स्वतःच्या नावाचा उल्लेख 'दीपिका पदुकोण सिंह' असा केला आहे. यामुळे आता फक्त दीपिका पदुकोण असं नाव उच्चारल्यामुळे चर्चा सुरू झाली. 


दीपिकाने जेएनयूमध्ये हजेरी लावल्यानंतर हा 'छपाक' करता प्रमोशन फंडा तर नाही ना असा सवाल देखील उठवला जात आहे. 10 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका नवी दिल्ली, लखनऊ आणि मुंबई सारख्या ठिकाणी जात आहे.