नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये 'सिरीयल किसर' चा किताब इम्रान हाश्मीकडे आहे. मात्र दीपिकाने हा किताब तिचा को-स्टार आणि कथित बॉयफ्रेंड रणवीर सिंगला दिला आहे. याचा खुलासा दीपिकाने नेहा धुपियाचा शो 'वोग बीएफएफ' मध्ये केला. 


काय म्हणाली दीपिका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शो ची होस्ट नेहाने दीपिकाला विचारले की, बॉलिवूडमध्ये सर्वात चांगला किसर कोण आहे. यावर दीपिका बोलली, रणवीर सिंग बेस्ट किसर आहे. या शो मध्ये दीपिकाची लहान बहिण अनिषा पदुकोण देखील सहभागी झाली होती.
राम लीला, बाजीराव-मस्तानी या चित्रपटात दीपिकाने रणवीर सिंगसोबत काम केले आहे. त्यानंतर पद्मावतमध्ये देखील दोघे एकत्र झळकले. या शोमध्ये दीपिका-रणवीरच्या साखरपूड्याबद्दल होणाऱ्या चर्चेबद्दलही विचारण्यात आले. तेव्हा तिने साखरपूडा न केल्याचे सांगितले. त्यानंतर नेहाने तिचा हात पकडला आणि हसत म्हणाली, बघा तिच्या बोटावर निशाण आहे.


तिची बहिण तिची बेस्ट फ्रेंड


'बीएफएफएस विथ वोग' या शो मध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत येतात. या शो मध्ये दीपिकाची बेस्ट फ्रेंड तिची बहिण अनिषा होती. अनिषा राष्ट्रीय स्तरावरची गोल्फर आहे.