भर कार्यक्रमात रणवीरची पँट फाटते तेव्हा...
दीपिकाने शेअर केला हा खास किस्सा
मुंबई : बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची जोडी रिल आणि रिअल दोन्हीकडे चर्चेत असते. आतापर्यंत दोघांनी साकारलेले सिनेमे प्रेक्षकांच्या खास लिस्टपैकी एक आहेत. हल्लीच दीपिकाने रणवीर सिंहबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात डान्स करताना रणवीर सिंहची पँटच फाटली होती.
द कपिल शर्मा या शोमध्ये आपल्या आयुष्याशी संबंधीत अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी तिने रणवीर सिंहचा पँटचा किस्सा शेअर केला. रणवीर वेडेवाकडे चाळे करतो तेव्हा दीपिकाला अतिशय सावध राहावं लागतं असं देखील ती या शोमध्ये म्हणाली.
दीपिका म्हणाली की,'आम्ही बार्सिलोनात एका म्युझिक फेस्टिवलमध्ये होतो. तेव्हा रणवीर काहीतरी वेगळीच डान्स स्टेप करत होता. त्या कार्यक्रमात त्याने अतिशय सैल अशी पँट घातली होती. अचानक काहीतरी वेगळा आवाज आला. मी नीट लक्ष देऊन पाहिलं तेव्हा कळलं भरं कार्यक्रमात रणवीरची पँट फाटली होती. तेव्हा लोकं आमच्या आजूबाजूला होती.' पुढे दीपिका म्हणते की,'मी माझ्यासोबत शिवणकामाचं सामान म्हणजे सेफ्टी पिन, सुई-धाग्यासारख्या गोष्टीच घेऊन रणवीरसोबत फिरते.'
एवढंच नव्हे तर पुढे दीपिका सांगते की,'इतर स्त्रियांप्रमाणे मी देखील माझ्या नवऱ्याच्या म्हणजे रणवीरच्या पाकिटातून पैसे काढून घेते.' आपल्याला माहितच आहे रणवीर त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो. त्याचा एखाद्या सोहळ्यातील वावर हा कायमच लक्षवेधी असतो.
काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ब्यूमोंड टॉवरमध्ये असलेल्या दीपिकाच्या घरामुळे. 33 माळ्याच्या या इमारतीत 26 व्या मजल्यावर दीपिकाचं घर आहे. 2010 मध्ये तिने 16 करोड रुपयांना हे घर खरेदी केलं. आता अशी माहिती मिळतेय की, या इमारतीत रणवीर सिंहने चार बीएचके फ्लॅट भाडेतत्वावर घेतला आहे.
तीन वर्षाकरता हा फ्लॅट घेतला असून 7.97 लाख रुपये याचे महिन्याचे भाडे आहे. बराचकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका-रणवीरने 2018 मध्ये लग्न केलं आहे.