नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर भूरळ पाडली आहे. मात्र तिच्यात अजून एक कला आहे ज्याची जाणीव कोणालाच नाहीच. पण त्या कलेचा पूरावा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाने सातवीत असताना एक कविता लिहिली होती. ती तिने आता सोशल मीडियावर शेअर केली. ती शेअर करत असताना तिने लिहिले की, मी सातवीत असताना कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता. दीपिकाच्या या कवितेचे नाव आहे आय अॅम.


कविता अशी आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आय अॅम अ चाईल्ड विथ लव अॅँन्ड केअर, आय वंडर हाओ फॉर द स्टार्स रिच, आय हिअर रश ऑफ द वेव्स, आय सी द डीप ब्लू सी... तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या या कलेचे कौतुक अनेकांनी केले.



नव्या सिनेमासाठी दीपिकाची जय्यद तयारी


अलिकडेच दीपिकाचा पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. या सिनेमात रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.लवकरच दीपिका विशाल भारद्वाजच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करेल. या सिनेमाची कथा सपना दीदीवर आधारित आहे. यात दीपिका लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे नाव रानी असून भूमिकेसाठी दीपिका जय्यद तयारी करत आहे. यात दीपिकासोबत इरफान खान देखील आहे. यापूर्वी या दोघांनी पीकू सिनेमात एकत्र काम केले होते.