नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वादग्रस्त सिनेमा पद्मावत अलीकडेच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतरही सिनेमा, त्यातील कलाकारांच्या भूमिका चर्चेचा विषय ठरत आहेत. सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादाने दीपिका सुखावली आहे. आता दीपिकने वोग मॅग्झिनच्या फेब्रुवारी अंकासाठी फोटोशूट केले. दीपिकाचे हे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.


दीपिकाचा कलरफूल अंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोगच्या कव्हर पेजवर दीपिकाचा कलरफूल अंदाज दिसत आहे. फोटोतील तिचे हास्य लक्ष वेधून घेते. तर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. या अंकाचे नाव आहे हॅपी इशू- जे दीपिकाच्या हास्यातून खरे ठरते. या अंकात दीपिकाने तिच्या नैराश्याचे अनुभव शेअर केले आहेत.



 


दीपिकाचा मोठा निर्णय


पद्मावत सिनेमाच्या अनुभवानंतर दीपिकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ऐतिहासिक भूमिका न करण्याचा. सध्या ती विशाल भारद्वाज दिग्दर्शित सोना दीदी चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटात दीपिकासोबत इरफान खानही दिसणार आहे. 



पद्मावतची जबरदस्त कमाई


पद्मावतबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १४३ कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर परदेशातही चित्रपट चांगली कमाई करत आहे.