मुंबईः दीपिका पदुकोणचा लूक आणि तिची स्टाइल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. अभिनेत्रीचा पार्टी लूकच नाही तर एअरपोर्ट लूकही खूप चर्चेत येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण नेहमीप्रमाणे स्टायलिश लूकसह साध्या ड्रेसमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचली. अभिनेत्रीने पायजामासह पांढरा टॉप घातला होता. यासोबतच तिने पोनीसोबत बारीक मेकअप आणि गॉगलही कॅरी केले होते. त्याचवेळी तिने एक मोठी बॅग धरली होती..


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Voompla (@voompla)


दीपिका पदुकोणने 'गहरियां' चित्रपटात जबरदस्त किसिंग सीन दिले होते. एका मुलाखतीत तिने शकुन बत्रा आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. शकुनने एका सीनसाठी 48 टेक घेतल्याचा खुलासा दीपिकाने केला होता.


'गेहराईयाँ'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाने चित्रपटाच्या इंटिमेट सीनबद्दल सांगितले. एका सीनसाठी 48 टेक देणं सोपं नसल्याचं दीपिकाने म्हटलं होतं.


दीपिका पदुकोण शेवटची 'गेहराईयाँ' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी काम केले होते.


चित्रपटात दीपिका पदुकोणने सिद्धांत चतुर्वेदीसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. यापूर्वी दीपिका पदुकोणने '83' चित्रपटात काम केले होते ज्यामध्ये ती पती रणवीर सिंगसोबत दिसली होती.