मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2008 मध्ये तिने ओम शांती ओम या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. दीपिका पदुकोण गेल्या 16 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण या दिवसांत रणवीर सिंहसोबत तिच्या सुखी संसारात व्यस्त आहे. मात्र एकवेळ अशी होती जेव्हा दीपिका आणि रणबीरच्या अफेअर्सच्या चर्चा सगळ्यांच्या तोंडात ऐकायला मिळत होत्या. बचना ए हसिना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात एकत्र काम केल्यानंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या जवळ आली आणि एकमेकांच्या प्रेमात पडली. 
यानंतर यांच्या अफेअर्सच्या चर्चा सर्वत्र पसरु लागल्या. बॉलिवूडची क्यूट जोडी म्हणूनही या जोडीकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र सगळं काही सुरळित सुरु असताना अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर जेव्हा दीपिका कॉफी विथ करणमध्ये दिसली तेव्हा तिने रणबीरची खूप खिल्ली उडवली. अभिनेत्याची खिल्ली उडवत अभिनेत्रीने सांगितलं की,  तिला अभिनेत्याला कंडोमचं पॅकेट गिफ्ट करायचं आहे. 


दिपीका जितकी चर्चेत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे असते तितकीच चर्चेत ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही असते. दीपिका शेवटची जवान या सिनेमात दिसली होती. लवकरच अभिनेत्रीचा फायटर्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र आज आम्ही तुम्हाला दिपीकाच्या एका वक्तव्याबद्दल सांगणार होतो ज्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. खरंतर अभिनेत्रीच्या वाढदिवसामुळ दीपिका पदुकोणचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने रणबीर कपूरला असा सल्ला दिला होता, जो ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. मात्र, हे ऐकून ऋषी कपूरही खूप संतापले होते.


गिफ्ट द्यायचं होतं कंडोम पकेट 
दीपिका पदुकोण काही वर्षांपुर्वी करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये पोहचली होती. ज्यामध्ये तिने तिच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशन लाईफशी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. याच दरम्यान तिने रणबीर कपूरसंबधित धक्कादायक खुलासे केले होते. शोमध्ये जेव्हा दीपिकाला प्रश्न विचारला गेला की, रणबीर कपूरला गिफ्टमध्ये काय देईल? या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली, 'रणबीर कपूरला मला कंडोमचं पॅकेट गिफ्ट द्यायला आवडेल. कारण तो त्याचा खूप वापर करतो.' एवढंच नव्हेतर पुढे अभिनेत्री असंही म्हणाली की, 'रणबीरने कंडोमची जाहिरात करावी.'


दीपिकाच्या वक्तव्यावर ऋषि कपूर झाले होते नाराज
जेव्हा दीपिकाचं हे वक्तव्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा हे ऐकून ऋषि कपूर खूप नाराज झाले होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये वक्तव्य करत म्हटलं की, 'आजच्या अभिनेत्रींनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तिच्या वडिलांच्या कामगिरीमुळे तिला या शोमध्ये बोलावण्यात आलं होतं, तिने स्वत: अजून काही मिळवलेलं नाही.' नाव न घेता ऋषि कपूर यांनी असं वक्तव्य केलं.