दीपिकाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा...
ग्लोबल स्टार आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
मुंबई : ग्लोबल स्टार आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आता दीपिका मादाम तुसा म्युझियममध्ये आपली जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे. लंडनमधील मादाम तुसा म्युझियममध्ये आता दीपिका पदुकोणचा वॅक्स स्टॅचू बनवण्यात येणार आहे. त्याच्यासाठी दीपिका लंडनला रवाना झाली आहे.
२०१८ हे वर्ष यशस्वी वर्ष
लंडनमधील मादाम तुसा म्युझियममध्ये त्यांच्या प्रसिद्धीच्या मापदंडात बसलेल्या लोकप्रिय लोकांचे स्टॅचू उभारण्यात येतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी २०१८ हे वर्ष अतिशय यशस्वी ठरले. पद्मावतच्या रेकॉर्डतोड कमाईपासून वर्षाची सुरुवात झाली. पद्मावत सिनेमात राणी पद्मिनीच्या तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. सिनेमाने ३०० कोटींची धमाकेदार कमाई केली. त्याचबरोबर टाईम्स पत्रिकेनुसार १०० प्रभावशाली लोकांमध्ये दीपिकाचे नाव सामिल आहे.
अभिनयाशिवाय याबद्दलही सन्मानित करण्यात आले
मेट गाला आणि कान्स २०१८ मध्ये आपल्या दमदार हजेरीने तिने सर्वांचे मन जिंकले. याशिवाय दीपिकाला सिनेमातील योगदान आणि इतरांना मदत करण्यात सहभागी झाल्याने त्याचबरोबर वादविवाद योग पद्धतीने सांभाळल्याने सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप
बाजीराव मस्तानी, पीकू, पद्मावत यांसारख्या बॉलिवूड सिनेमातूनच नाही तर "xxx: रिटर्न ऑफ जेंडर केज यासारख्या हॉलिवूड सिनेमातून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली. नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत ती विवाहबद्ध होईल.