मुंबई : अभिनत्री कायम मेकअप करतात म्हणून त्या नेहमी सुंदर दिसतात. मेकअपमुळे प्रत्येक जण सुंदर दिसतो, पण एक बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी विना मेकअप देखील प्रचंड सुंदर दिसते. ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण... सध्या दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विना मेकअप दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'निवड चमकण्याची...' असं लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाच्या या फोटोवर युझर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तिचे सर्व चाहते तिच्या नैसर्गिक सौंदर्याचं कौतुक करत आहेत. दीपिकाचा फोटो पाहून चाहते तिला तू मेकअप करायला विसरली तर नाही ना? प्रश्न विचारत आहे.



तर काही चाहते दीपिकाला सुंदर दिसण्यासाठी मेकअपची गरजचं नाही. असं म्हणत आहेत. एकंदर सांगायचं झालं तर दीपिकाच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.  सध्या दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे. 


दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं ती लवकरचं 'पठाण' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. एवढंच नाही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या दीपिकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.