मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'छपाक' सिनेमा उद्या १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र, त्याआधी तो वादात अडकला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका नंतर मागे घेण्यात आली. हा वाद मिटतो न मिटतो तोवर दुसरा वाद उभा राहिला. दीपिका दिल्लीत असताना 'जेएनयू' हल्ला प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी गेली. आंदोलन ठिकाणी तिने हजेरी लावली. मात्र, तोंडातून एकही शब्द काढला नाही आणि ती दहा मिनिटांत निघून गेली. त्यानंतर दीपिका ट्रोल झाली. असे असताना आता 'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्य सरकारने तशी घोषणाच केली. त्यानंतर आता छत्तीसगडमध्येही  'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'छपाक' या सिनेमावर अनेक संकटे आली आहेत. तरीही हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. मध्य प्रदेशमधील सरकारने हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे यावर आता करमणूक कर नसणार आहे. दरम्यान, हा सिनेमा भ्याड अॅसिड हल्ल्यावर साकारला आहे. तर दुसरीकडे पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात क्रेडिट न दिल्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात मागणी केली. वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असे असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आलेले नाही. याचविरुद्ध भट्टने दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.



शुक्रवारी देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. विक्रांत मेसी आणि दिपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत.


याआधी अपर्णाने तिच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून सिनेमात तिला क्रेडिट न दिल्याचे सांगितले होते. याशिवाय निर्मात्यांविरोधात ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिने या पोस्टमध्ये लिहिले होते. अपर्णाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'छपाक पाहिल्यानंतर मी अधिक अस्वस्थ आहे. मला माझी ओळख वाचवण्यासाठी आणि माझा प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्यासाठी मला कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. उद्या कोणी माझं प्रतिनिधित्व करेल. आयुष्याची हीच विडंबना आहे.' यानंतर तिने दीपिका आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही उल्लेख केला. दरम्यान, आता दिल्ली कोर्टाने ‘छपाक’ निर्मात्यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले आहेत. निर्मात्या अपर्णा भट यांना चित्रपटात क्रेडिट देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.   


मंगळवारी 'छपाक' चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी, कायद्यानुसार सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइट असल्याचा दावा करण्यात येऊ शकत नसल्याने, चित्रपट प्रदर्शनावरील स्थगितीच्या मागणीची याचिका फेटाळण्यात येण्याची विनंती केली होती. अखेर याचिकाकर्त्यांकडून स्थगितीसाठीची याचिका मागे घेण्यात आली.