मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग एकत्र असल्याची तसेच ते दोघेही लग्न करत असल्याच्या चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. दरम्यान, या नात्याबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र आता दीपिकाने रणवीर हा आपलाच असल्याचे म्हटलेय. रणवीरने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. या फोटोत नेहमीप्रमाणे रणवीर स्मार्ट दिसतोय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


रणवीरच्या चाहत्यांना त्याचा हा फोटो केवळ आवडलाच नाही तर त्यांनी त्यावर कमेंट्सही दिल्यात. रणवीरच्या या फोटोला 1,579,405 अधिकाहून अधिक लोकांनी लाईक केलेय. यादरम्यान दीपिकाने रणवीरच्या फोटोखाली कमेंट केलीये. दीपिकाची ही कमेंट पाहून त्याचे फॅन्स चांगलेच खुश होतील. दीपिकाने रणवीर केवळ आपला असल्याचे म्हटलेय. भलेही आतापर्यंत दीपिका आणि रणवीर यांच्याकडून नात्यावर शिक्कामोर्तब झालेले नाहीये मात्र दोघेही अनेकदा सोशल मीडियावरुन प्रेम व्यक्त करत असतात.



गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही या वर्षी लग्नबंधनात अडकू शकतात. दरम्यान दोन्ही बाजूंनी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. दीपिका आणि रणवीर हे दोघेही पद्मावत या सिनेमात शेवटचे एकत्र दिसले होते. यात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती तर रणवीरने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती.