मुंबई : दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने लहान बहिण अनिशा पादुकोणचे फोटो शेअर केले होते. हे फोटो रणवीर सिंगने क्लिक केले होते. दीपिकाने वर्ल्ड रोलरॉस्टर डे या हॅशटॅगसह हा फोटो शेअर केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने आता एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचा फोटो शेअर केला आहे. दीपिका रणबीरचा फोटो काढत असताना हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. रणबीर या फोटोमध्ये खूप लांब बसला आहे. पण दीपिकाने हा फोटो सहज शेअर केलेला नाही. अनेकांना प्रश्न पडला असेल की दीपिकाने आता तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोटो का शेअर केला?. दीपिकाने हा फोटो शेअर करुन फॉलोअर्सला वर्ल्ड फोटोग्राफी डेवर शुभेच्छा दिल्या आहेत.



हा फोटो तमाशा सिनेमाच्या दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये रणबीर एका डोंगरावर बसलेला दिसत आहे.