मुंबई : आजकाल प्रत्येक अभिनेत्री इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या अभिनेत्री सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. अशाच एका अभिनेत्रीने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने तुफान डान्स केला आहे. हा डान्स करतानाच तिचे कपडे फाटले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय? 
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह (Deepika Singh) सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते.असाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती तुफान डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना तिचे कपडे फाटल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर त्याच व्हिडिओत ती कपडे फाटल्याचे दाखवत आहे. हा व्हिडिओ तिचा सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घालतो आहे.  


या व्हिडिओमध्ये अभिनेत्री 'थोडा तेरी आँखों पर मार गया' गाण्यावर डोलताना दिसत आहे. या गाण्यात अभिनेत्री तिचं सौंदर्य इतकं खुलवताना दिसत आहे की अचानक तिचा कुर्ता टाचांमध्ये अडकतो. यानंतर दीपिका सिंह (Deepika Singh) टाचांमध्ये अडकलेला कुर्ता बाहेर काढते आणि तो फाटलेला कॅमेऱ्यात दाखवते. हा व्हिडिओ पाहता, अभिनेत्रीने लॉबीमध्ये हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने जीन्ससोबत लॉग कुर्ता आणि दुपट्टा घातला आहे. हा तिचा लुकही चाहत्यांना आवडला आहे. 



हा डान्स व्हिडिओ दीपिका सिंहने (Deepika Singh) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मी जरा हलली तर... अरेरे'.  दीपिका सिंहने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. 


दीपिका सिंह (Deepika Singh) ही संध्या बिंदी नावाने पडद्यावर प्रसिद्ध आहे. ती 'दिया और बाती हम' (Diya Aur Baati Hum) या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. ही मालिका बंद होऊन बरीच वर्षे उलटली आहेत, पण या मालिकेत संध्या बिंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आजही तिच्या मालिकेच्या नावाने ओळखली जाते. दीपिका सिंग आता टीव्ही मालिकांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे.