मुंबई :झी टॉकीज वाहिनीतर्फे किर्तनकारांचा गौरव करण्यात आला.  १८ ऑक्टोबरला सायंकाळी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा सायंकाळी ६ वाजता पार पडला.  यावेळी महाराष्ट्रातील किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी सिनेमा क्षेत्रातील मान्यवर सुबोध भावे , हार्दिक जोशी , भाऊ कदम असे अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. हा सोहळा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा हो सोहळा प्रक्षेपित केला जाणार आहे ज्याचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळयाचे निवेदन दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांनी केलं. साहजिकच महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकारांच्या सन्मानार्थ आयोजित सोहळ्याची सूत्रं गुंफण्याचा आनंद आणि आव्हान पेलण्यात दीप्ती आणि क्षितीश यांनी बाजी मारली आहे.


झी टॉकीज वाहिनीवरील गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं नित्य निवेदन दीप्ती भागवत करतच असते पण ज्या मंचावर महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार एकत्र असणार आहेत, ज्यांच्या शब्दप्राविण्याने अख्खा महाराष्ट्र प्रभावित होत असतो त्या कीर्तनकारांसमोर निवेदनातून कार्यक्रमाची बांधणी करत असताना दीप्तीने अर्थातच खूप तयारी केली. दीप्तीला या सोहळयाच्या निवेदनासाठी साथ मिळाली ती अभिनेता क्षितीश दाते याची. निवेदक म्हणून एकमेकांशी समरस होत दीप्ती आणि क्षितीश यांनी या कार्यक्रमाच्या निवेदनाला श्रवणीय प्रवाही बनवलं.


क्षितीश दाते आणि दीप्ती भागवत यांनी या सोहळ्याची सूत्रं खूप छान गुंफली आहेत. उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा या कार्यक्रमाच्या दोन बाजू आहेत. मंचावर महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचा गौरवही झाला आणि या निमित्ताने कीर्तनाचा उत्सवही झाला. शिवाय नंदेश उमप यांच्या गाण्यांची सुरेल साथ होती. अनेक कलाकारांनी त्यांची कला सादर केली. या सगळ्या सोहळयाला मनोरंजन आणि माहिती यांच्या धाग्यात गुंफणारी निवेदनशैली दीप्ती आणि क्षितीश यांनी अप्रतिम साकारली आहे.हा सोहळा  २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे .