मुंबई : 14 नोव्हेंबरला बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंह विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत इटलीमध्ये आहे. दोघांच्या फॅन्समध्ये लग्नाबाबत उत्साह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाची चर्चा सुरु असताना अखेर 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.


मुंबई आणि बंगळुरुमध्ये रिसेप्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि रणवीर सिंह भारतात आल्यानंतर मुंबई आणि बंगळुरुमध्ये दोघांचे आई-वडील रिसेप्शन पार्टी देणार आहेत. पण रिसेप्शन कार्डमध्ये एक अनोखी टीप ठेवण्यात आली आहे. सामान्यपणे आहेर आणू नये अशी टीप पत्रिकेमध्ये असते. 


गिफ्ट चॅरेटीच्या रुपात डोनेट करा  


रिसेप्शन कार्डच्या माध्यमातून रणवीर आणि दीपिकाने हे गिफ्ट दान करण्याचं आवाहन पाहुण्यांना केलं आहे. रणवीर आणि दीपिका एक संस्थेशी जोडलेले आहेत. त्यांनी पाहुण्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी या संस्थेला गिफ्ट डोनेट करावे.


मुंबईमध्ये 28 नोव्हेंबरला रिसेप्शन


दीपवीरचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत तर 21 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये होणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती, बॉलिवूड कलाकार आणि इतर क्षेत्रातील पाहुणे हजेरी लावतील.


5 वर्षापासून करत होते डेट


मागील 5 वर्षापासून दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत होते. पण त्यांना या नंतर हे नातं पुढे नेण्याचं ठरवलं आणि दोघांनी ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.


काय लिहिलंय पत्रिकेत पाहा...