सुशांतच्या एक्स-मॅनेजरची फाइल चुकून डिलीट झाली, मुंबई पोलिसांची माहिती
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
मुंबई : मंगळवारी रात्री सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. बिहार पोलिसांनी आता त्यांच्या चौकशीचा मोर्चा सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येच्या दिशेकडे वळवला आहे. त्यासाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूच्या फाईल संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचले.
मात्र, दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं अशक्य असल्याचं बिहाप पोलिसांना सांगण्यात आलं.
शिवाय पोलीस याप्रकरणातील सर्व माहिती सांगण्यासाठी तयार होते. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदतही केली. पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला. दरम्यान, सुशांत आणि दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या दृष्टीने बिहार पोलीस सध्या तपास करत आहेत.
दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत असताना महाराष्ट्र सरकारने या चौकशीस नकार दिला आहे.