नवी दिल्ली : नवरी म्हटली की, हसरी, लाजरी, नटलेली मुलगी आपल्या डोळ्यासमोर येते. पण अशी नवरी तुम्ही कधी पाहिली नसेल. या नव्या नवरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


पहा तिची कला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही नवरी छान नटली आहे. पण जीन्स घातली आहे. तिच्यातील कला लग्नातील फोटोग्राफरने टिपली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तिची कला म्हणजे तिचा जबरदस्त डान्स.


कोण आहे ही?


या नवरीचे नाव आहे राशिका यादव. जी लग्नासाठी जवळपास तयार झाली आहे. पण लेहंगा न घातला तिने जिन्स घातली आहे. आणि त्यात ती जबरदस्त डान्स करत आहे. यात तुम्हाला फक्त राशिकाचा भांगडाच नाही तर बेली डान्सही पाहायला मिळेल.



७ लाख लोकांनी पाहिला हा व्हिडिओ 


हा व्हिडिओ शेअर करत दिल्लीतील फोटोग्राफरने लिहिले की, कोणत्याही कूल ब्राईडला टॅग करा. तुम्ही नवरीला नाचताना पाहिले असेल पण अशाप्रकारे नाही. राशिकाने १६ वर्ष शास्त्रिय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तुम्हीही पहा या बिनधास्त नवरीचा हा मजेदार डान्स. 
हा व्हिडिओ वेडिंग फोटोग्राफर प्रियंका कंबोज चोप्राने शेअर केला आहे आणि आतापर्यंत हा व्हिडिओ ७ लाख लोकांनी पाहिला आहे.