मुंबई : Netflix ची 'सेक्रेड गेम्स' ही सिरीज सध्या भरपूर चर्चेत आहे. ही सिरीज लिक झाल्यामुळे सोशल मीडियावर याचे असंख्य क्लिप्स व्हायरल होत आहेत. यामुळे यावर आता अगदी मोकळेपणाने चर्चा होत आहे. 'सेक्रेड गेम्स' यामधील काही दृश्यांमुळे ही सिरीज अधिक व्हायरल झाली. असं असताना ही दृश्य हटवण्याची मागणीवर याचिका दाखल करण्यात आली होती. यावर 16 जुलै रोजी सुनावणी करण्यात आली होती. याचिकेत असा दावा केला आहे की, वेब सिरीजमध्ये काही ठिकाणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान केला आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासमोर आल्यावर ते याचिका आणि सीडी याची पाहणी करतील आणि सोमवारी यावर निर्णय देतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, 'सेक्रेड गेम्स' यातील काही दृश्यांमधून आणि संवादातून काँग्रेसचे दिवंगत नेत्यांचा अपमान होत आहे. वकील शशांक गर्गच्या माध्यमातून ही याचिका वकील निखिल भल्लाने दाखल केली आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्धीकी या सिरीजमध्ये बोफोर्स मुद्दा, शाहबानो प्रकरण, बाबरी मस्जिद प्रकरण आणि दंगली सारख्या देशातील वेगवेगळ्या घटनांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली आहे. 


'सेक्रेड गेम्स' या सिरीजमध्ये अनेकदा बोल्ड सिन तसेच शिव्यांचा वापर केल्यामुळे या सिरीजवर बंधन आणण्याची गरज असल्याचं देखील बोलण्यात आलं. वेब सिरीजमध्ये सेन्सर बोर्ड नसल्यामुळे अनुराग कश्यपने याचा फायदा उचलला असल्याची चर्चा आहे.