मुंबई : हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री डेमी मूरने नुकतीच धक्कादायक वक्तव्य केली आहेत. डेमी टीव्ही शो 'गुड मॉर्निंग अमेरिका' मध्ये पोहोचली होती. तिथे डेमीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे यामुळे तिच्या चाहत्यांना आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेमीने सांगितल्यानुसार, वयाच्या 15 व्या वर्षी तिला तिच्या आईने 500 डॉलरकरता एका व्यक्तीला विकलं होतं. ज्याने तिच्यावर रेप केला. डेमीने पुढे सांगितलं की, तिची आई भरपूर दारू पिअत असे. एकदा तर तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. 


माझ्यावर रेप करण्याची परवानगी द्यायची तेव्हा ती इतकी दारू प्यायलेली असायची की, तिला शुद्ध देखील नसायची. डेमीच्या या वक्तव्याने ती अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर काही तिला सहानुभूती देत आहेत तर काहींनी तिच्या या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. 


तसेच डेमीने हार्पर्स बाजारला दिलेल्या मुलाखतीत सांगितल होतं की, एस्टन कुचरने लग्नानंतर तिला धोका दिला होता. डेमीने एस्टनसोबत 2005 मध्ये लग्न केलं होतं. डेमीचं हे तिसरं लग्न असून एस्टन डेमीपेक्षा 15 वर्षे लहान आहे. डेमीने सांगितलं की, तिचा नवरा एस्टन तिला बाथटबमध्ये दोन महिलांसोबत दिसला होता. 


डेमी आणि एस्टन यांचं नातं 2013 मध्ये संपलं. डेमीची एकूण तीन लग्न झाली असून पहिलं लग्न 1980 मध्ये फ्रेडी मूरसोबत झालं तर 5 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. 1987 मध्ये डेमीने ब्रूस विल्ससोबत लग्न केलं पण हे दोघे 2000 मध्ये वेगळे झाले. 


धक्कादायक म्हणजे, आपण आपल्या बाळाला गर्भातच गमावल्याची धक्कादायक माहिती देखील तिने या मुलाखतीत दिली.