मुंबई :  सेलिब्रिटी वर्तुळात आणि सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट ट्रेंडमध्ये येण्यास आणि ती ट्रेंडमधून जाण्यास फारसा वेळ लागत नाही. याची अनेक उदाहरणं आजवर पाहायला मिळाली आहेत. यातच भर पडत आहे ती म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करणाऱ्या एका अशा हॅशटॅगची ज्यामुळं सध्या या बहुचर्चित वेब सीरिजला वादाची किनार मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरजच्या दुसऱ्या पर्वाची नुकतीच घोषणा करण्यात आली. तो नेमका प्रदर्शित कधी होणार याबाबतचीही माहिती देण्यात आली. ज्यानंतर काही प्रेक्षकांनी याबाबत उत्सुकता आणि कुतूहलाची भावना व्यक्त केली. तर, काहींनी मात्र Mirzapur 2वर बंदी आणण्याचीच मागणी केली. ज्यामुळं ट्विटरवर #BoycottMirzapur2 ट्रेंड करु लागला. 






 


वेब सीरिजला विरोध होण्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे मिर्झआपूरमधून झळकणाऱ्या अभिनेता अली फजल याचं एक ट्विट. २०१९ मध्ये अलीनं सीएए आणि एनआरसी आंदोलनांसंबंधी काही ट्विट केले होते. ज्यापैकी एका ट्विटमध्ये त्यानं म्हटलेलं, 'आंदोलनं... सुरु हतबलता म्हणून केली होती. आता मजा वाटतेय'. नेटकऱ्यांना अलीची ही भूमिका काही पटली नाही. परिणामी त्याच्या आगामी वेब सीरिजला विरोध करण्यास सुरुवात झाली.