मुंबई : ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदिर्घ आजारानंतर त्यांनी गुरूवारी अखेरचा श्वास घेतला. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या 'गांधी' चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी राधिका गुप्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. भानु अथैया यांनी  या  जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या कॉस्च्युम डिझाईनचा वारसा त्या मागे ठेवून गेल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आईच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'भारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या भानु अथैया यांचं निधन झालं आहे. त्यांनी 'लगान' आणि  'स्वदेस' या चित्रपटांसाठी अखेरचं कॉस्च्युम डिझाईन केलं होतं. '



महत्त्वाची गोष्टी म्हणजे अथ्थैया यांनी भारताचा पहिला ऑस्कर पुरस्कार परत केला आहे. त्याला कारण देखील तसं आहे. ऑस्कर हा पुरस्कार सोनं आणि जस्त या दोन धातूंपासून तयार करण्यात येतो. त्यामुळे कलाकार आर्थिक अडचणीत असताना त्यांचा हा मानाचा पुरस्कार विकतात. अशा घटना आतापर्यंत अनेक वेळा घडल्या आहेत.


शिवाय अनेकांचे पुरस्कार चोरीला देखील गेले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पुरस्काराची खूप काळजी वाटतं होती. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर पुरस्काराची योग्य काळजी कोण घेणार. असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. 


अखेर त्यांनी २०१२मध्ये  भारताचा ‘पहिला ऑस्कर’ऍकॅडमी संस्थेला परत केला आहे. संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवलं आहे.  भानु अथ्थैया यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कॉस्च्युम डिझाईन केलं आहे