Devara : जूनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा' चित्रपट  2024 मधील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशातच आता चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. त्यामुळे 'देवरा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटातून साउथमध्ये डेब्यू करत आहे. जूनियर एनटीआरच्या या चित्रपटाची रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला देखील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता अ‍ॅडव्हान्स बुकिंगने जोर धरला आहे. सोमवारपासून या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 


'देवरा' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग


रिपोर्टनुसार, जूनियर एनटीआरचा या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या शोसाठी देशभरात 7 लाख 34 हजार 761 तिकिटे विकली गेली आहेत. ज्यामधून चित्रपटाने रिलीजपूर्वीच 18.78 कोटींची कमाई केली आहे. अंदाजे ही कमाई 29.10 कोटी रुपये असू शकते. तेलगूमध्ये चित्रपटाचे 7 लाख 19 हजार 608 तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाची 16 हजार 3024 तिकिटे हिंदीत विकली गेली आहेत. 


कन्नडमध्ये 'देवरा'साठी आतापर्यंत 100 तिकिटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आली आहे. तर या चित्रपटाची 1678 तिकिटे तामिळमध्ये आधीच विकली गेली आहेत. तर सर्वात कमी तिकिटे मल्याळममध्ये विकली गेली आहेत.  जगभरात ग्रॉस अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा आकडा 50 कोटींवर पोहोचला आहे. 


पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा गाठणार


'देवरा' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 18 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाची मोठ्या प्रमाणात तिकिटे विकली जात आहेत. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग बघता हा चित्रपट पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई करु शकतो. जगभरात हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करू शकतो. मात्र, आता सर्वांच्या नजरा 'देवरा' चित्रपट रिलीजवर लागून राहिल्या आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.