मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'देवमाणूस' ही मालिका सध्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतेय. या मालिकेतील डॉक्टराचा खलनायिका अंदाज सगळेच एन्जॉय करतायेत. डॉक्टर सह या मालिकेत असलेल्या सरु आजीपासून ते छोट्या टोण्यापर्यंत सगळ्याचाच मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.त्यातच या मालिकेत चिमुकल्या मायराचे पात्र साकारणारी बालकलाकार मिमी खडसेनं देखील प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानग्या वयात तिने केलेला अभिनय पाहायला खूपच गोड वाटतो. या वयातच मिमीचे सोशल मीडियावर अधिकृत अकाऊंट असून तिने 87 हजारांहून अधिक फोलावर्सचा टप्पा पार केला आहे. 


मिमी नेहमीच आपले रिल व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने प्रिसेंस लूक मधील एक व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात तिने पिवळ्या रंगाचा डिझाईन फ्रॉक परिधान केला आहे. सोबतच तिची गोड हेअर स्टाईल देखील सगळ्याचच लक्षवेधून घेणारी ठरतेय.



मिमीला बऱ्याचदा तिच्या लांब केसांसाठी चाहत्यांकडून कॉम्प्लिमेंट मिळत असते. अभिनयासह मिमीने आतापर्यंत अनेक रॅम्प वॉक देखील केले आहेत.


शिक्षण आणि आवड याचा बॅलेन्स ठेवत मिमीने या वयातच आपला वेगळा फॅन बेस तयार केलाये,त्यामुळे येत्या काळात ही चिमुकली अजून काय नवं चाहत्यांसाठी घेऊन येतेय, याचीच उत्सुकता आहे.