मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांना जणू वेडचं लावलं आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या मालिकेतील कलाकारचं ही मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे. या कलाकारांना एका एपिसोडसाठी  किती मानधन मिळतं हे तुम्हाला माहिती आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवमाणूस मालिकेतील अजित कुमार देवपासून ते सरु आजीपर्यंत प्रत्येक पात्रानं आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. 



अजित कुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडचं सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे. किरण याआधी 'लागीर झालं जी' या मालिकेत झळकला होता. किरण मालिकेच्या एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळतं आहे.



एसीपी दिव्या सिंहची भूमिका घराघरात पोहोचवणारी अभिनेत्री नेहा खान एका भागासाठी जवळपास 18 हजार रुपये मानधन घेते.



काही दिवसांपूर्वीच देवमाणूस मालिकेत आर्या या नवीन पात्राची एन्ट्री झाली. ही भूमिका सोनाली पाटील या अभिनेत्रीने साकारली. सोनाली एका भागासाठी 16 हजार रुपये मानधन घेत असल्याचे समजते.



मालिकेतील सरू आजींनी तर आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांचच लक्षवेधून घेतलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रूक्मिणी सुतार या 75 वर्षांच्या आहेत. त्या प्रत्येक एपिसोडसाठी 15 हजार रूपये मानधन घेतात.




 देवमाणूस या मालिकेत चंदा हे नवे पात्र दिसले. सध्या चंदाची सर्वत्र चर्चा आहे. ही भूमिका माधुरी पवार या अभिनेत्रीने केली आहे. माधुरीला एका एपिसोडसाठी 14 हजार रुपये मिळतात.




मालिकेतील टोण्या हा सगळ्यापेक्षा वयाने लहान असला तरी त्याचं ही फॅन फॉलोविंग काही कमी नाही. बालकलाकार विरळ माने एका भागासाठी 10 हजार रुपये आकारतो.



डिम्पलचं पात्र साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख एका भागासाठी तब्बल 17 हजार रुपये घेते.



बज्या ही भूमिका किरण डांगे एका भागासाठी 11 हजार रुपये मानधन घेतो.