मुंबई : देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रानं रसिकांच्या मनात आपली खास ओळख कोरली आहे. या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे.


आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच समोरून मालिकेत एक नवीन चेहऱ्याची एंट्री झाल्याचं दिसत आहे.


सोनाली या नवीन भूमिकेची ओळख नुकतीच मालिकेत प्रेक्षकांना झाली आहे. सोनाली हि डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते.


समोरून मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील? आता तर डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत त्यामुळे आता मालिकेत काहीतरी इंटरेस्टिंग घडामोडी होणार हे मात्र नक्की.



प्रेक्षकांनी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता दुसऱ्या पर्वातील प्रत्येक भाग पाहण्यासाठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत.